
श्रीरामपूर : काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले आणि माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी, तर करण यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या व काँग्रेस नेत्या दीपाली ससाणे यांची भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडी श्रीरामपूर काँग्रेससाठी अभिमानास्पद क्षण ठरल्या आहेत.