
अहिल्यानगर : शिवसेनेतून ज्यांना जायचे होते ते गेले आहे. शिवसेना संघटना काही थांबली नाही. संघटनेमध्ये काम करताना सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. शिवसैनिक हा मालक आहे, ही भावना सातत्याने लक्षात ठेवा, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. दानवे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते.