
कोपरगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करत एक आदर्श निर्माण केला. विविध विकास कामातून त्यांनी शहरांचा कायापालट केला. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागणी केल्यानंतर कोपरगाव नगरपालिका हद्दीमध्ये नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहरासाठी २० लाखांचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी निधी मंजूर झाला. शहराच्या चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचा कंट्रोल शहर पोलिस ठाण्यांतर्गत राहणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी सांगितले.