

Shiv Sena Faces Internal Turmoil in Shrigonda Over Groupism
Sakal
श्रीगोंदे : श्रीगोंदे नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नऊ नगरसेवकांपैकी पाच जणांनी सोमवारी (ता.१३) जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेनेच्या गटनोंदणीसाठी ओळख परेड केल्याची माहिती समजली. चार नगरसेवकांना बाजूला ठेवत ही गटनोंदणीची प्रक्रिया सुरू झाल्याने शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.