रक्तटंचाईवर मात करण्यासाठी नेवाशात शिवसेना सरसावली

सुनील गर्जे
Sunday, 6 December 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियमांचे पालन करत 45 शिवसैनिकांनी रक्तदान केले. सायंकाळी युवा सेनेचे तालुका प्रमुख कैलास लष्करे यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

नेवासे: कोरोना काळात राज्यातील रक्ताची टंचाई भासत आहे, अशा परिस्थितीत रुग्णांना जीवनदान देण्यासाठी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करा असे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत नेवासे शहर शिवसेना व युवासेनेतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 45 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. 

नेवासे पंचायत समिती आवारात आयोजित रक्तदान शिबिरांचे उदघाटन शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नीरज नांगरे, युवा सेनेना तालुका प्रमुख कैलास लष्करे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास लष्करे, सागर शिंदे, राहुल कुसळकर शुभम डोकडे, अभिजित राऊत, माऊली दहातोंडे सदा गाडेकर अजय शेंडगे उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियमांचे पालन करत 45 शिवसैनिकांनी रक्तदान केले. सायंकाळी युवा सेनेचे तालुका प्रमुख कैलास लष्करे यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

रक्तदान शिबिरासाठी लोकमान्य ब्लड बॅंकचे सहकार्ये लाभले. डाॅ केशव वाघ यांनी रक्तदात्यांसह उपस्थितांचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena organizes blood donation camp in Nevasa