
संगमनेर : इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत तृतीय भाषा म्हणून हिंदी विषय लागू करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, संगमनेरमध्ये रविवारी (ता. २९) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र निषेध नोंदवत बसस्थानक परिसरात हिंदी विषयाच्या निर्णयाची होळी केली. हा निर्णय सक्तीचा नसल्याचे सरकार सांगत असले, तरी ‘२० विद्यार्थी एकत्र येऊन हिंदी नको, म्हटल्यास इतर भाषा देता येईल,’ अशी अर्धवट व संभ्रम निर्माण करणारी अट देऊन सरकारने मराठी भाषकांचा अपमान केला आहे, अशी टीका करण्यात आली.