
मिलिंद नार्वेकर यांनी शिवालय येथेही अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करुन पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी चर्चा केली.
नगर ः कट्टर शिवसैनिक माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब काहीसे राजकारणातून बाजूला पडले आहे. त्यांच्या शिवसैनिकांकडून धीर दिला जात आहे. शिवसेनेचे राज्य पातळीवरील नेत्यांनीही त्यांच्या कटुंबासोबत आधार देण्याचे प्रयत्न चालविला आहे.
शिवसेनेचे माजी आमदार (कै.) अनिल राठोड यांच्या परिवाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घडवून देणार आहे, असा शब्द शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी नुकतीच राठोड कुटुंबियांना दिला.
शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी (कै.) अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड, अमोल ठाकूर, विनया ठाकूर, मीरा मिलिंद नार्वेकर, शुभदा मालवणकर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम आदी उपस्थित होते.
यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी शिवालय येथेही अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करुन पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी चर्चा केली.