
राहाता: शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात राज्य सरकारातील वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी संजय शिरसाठ, माणिकराव कोकाटे, योगेश कदम व गिरीश महाजन या मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.