राष्ट्रवादीमुळे नगरच्या महापौरपदी सेनेच्या शेंडगे बिनविरोध

Nagar mahapalika
Nagar mahapalika

नगर : महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीने शहरात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अशी नवीन "राजकीय सोयरिक" जमली आहे. या दोन पक्षात नेहमी घमासान असायचे. आता या निवडीमुळे ते काहीसे थंड होईल. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीमुळे भाजपला सत्ता मिळाली होती. आता महाविकास आघाडीचा धर्म राष्ट्रवादीने पाळला.

महापौर आणि उपमहापौरपदासाठी एकेकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार होती. कालच त्यावर शिक्कामोर्तब झाले. भाजप वगळता सर्व पक्ष एकत्र आले आहेत. सकाळी ११ वाजता महापालिकेची ऑनलाइन महासभा झाली. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. शेंडगे यांना नगरसेविका पुष्पा बोरूडे व अनिल शिंदे तर उपमहापौर भोसले यांना नगरसेवक कुमारसिंह वाकळे व समद खान सूचक अनुमोदक होते. आज महापालिकेचा अठरावा वर्धापन दिन आहे. त्याच दिवशी नवीन पदाधिकारी मिळाले.

शिवसेनेकडून शेंडगे यांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसकडून चव्हाण यांच्या समर्थकांनी महापौर व उपमहापौरपदाचे प्रत्येकी एकेक उमेदवारी अर्ज नेले; मात्र ते दाखल केले नाहीत. गणेश भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला होता. (Shiv Sena's Rohini Shendge as the Mayor of Ahmednagar)

Nagar mahapalika
महसूल मंत्र्यांच्या कन्येने काढली पडळकरांची पात्रता

या वेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, बसपचे नगरसेवक मुदस्सर शेख, सचिन जाधव, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, काँग्रेसचे उबेद शेख आदी उपस्थित होते.

एक पक्ष सोडून आम्ही सर्व एकत्र आहेत. राज्यात आघाडी सरकार आहे. राज्य सरकारकडून निधी आणण्यासाठी दोन्ही पदाधिकारी प्रयत्न करतील. त्यामुळे शहराचा विकास होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांत महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी घेतलेले निर्णय अमलात आले आहेत. नगर शहरात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत आहे. विरोधासाठी विरोध न करता शहराच्या विकासासाठी काम होणार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे प्रभारी अंकुश काकडे यांनी दिली होती.

शिवसेना नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत विळ्या-भोपळ्याचे सख्य होते. माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेत दोन गट पडले. एक गट सुरूवातीपासून राष्ट्रवादीसोबत मिळती-जुळती भूमिका घेत होता. तर दुसरा गट कायम राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात मांड ठोकून होता. त्या गटाने भाजपसोबत जाऊन सत्ता मिळवण्याचाही प्रयत्न केला. त्यासाठी राजकीय बैठकाही झडल्या. परंतु मुंबईतून वरिष्ठ पातळीवरून सगळी सूत्रे हलली. नेहमीप्रमाणे मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

सगळं व्यवस्थित घडत असताना शिवसेनेत मिठाचा खडा पडला. महापौरपदाच्या निवडणुकीत डावलल्याने एका गटाने थेट दुसऱ्या गटावर हल्ला चढवला. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनाही प्रसाद मिळाला. एका हॉटेलमध्ये मध्यरात्री घडलेले हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत गेले. परंतु तेथे त्यांच्या समेट झाल्याने तक्रार दाखल झाली नाही. त्यामुळे यावादावर पडदा पडला. मात्र, सोशल मीडियात या प्रकरणाची चर्चा झालीच.

वाद चव्हाट्यावर

नगरसेवक पती नीलेश भाकरे यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. निवडणुकीतून आपण माघार घेतली होती. तरीही संभाजी कदम यांनी मला दारू पाजली. या प्रकरणात नगरसेवक अनिल शिंदे यांचेही नाव समोर आले आहे. त्यांच्यावरही आरोप होत आहे. दुसरीकडे भाकरे यांनी उमेदवारी न मिळाल्याने तोडफोड केल्याचे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. एकंदरीत या प्रकरणामुळे शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

(Shiv Sena's Rohini Shendge as the Mayor of Ahmednagar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com