
पाथर्डी : कर्नाटक राज्यात छत्रपती शहाजीराजे यांची समाधी आहे. ती सुस्थितीत नसून त्या ठिकाणी यथोचित स्मारक उभारावे, अशी मागणी आमदार शिवाजी गर्जे यांनी विधानपरिषद सभागृहात केली. शहाजीराजे यांच्या समाधीस्थळी स्मारक उभारण्यासाठी कर्नाटक सरकारला परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही करू. कर्नाटक सरकारची परवानगी मिळताच शहाजीराजे यांची समाधी कर्नाटक राज्यात उभारली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.