
श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे श्रीरामपूरकरांचे दीर्घकाळाचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. आज (ता. ३) या पुतळ्याचे शहरात ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ''शिवसृष्टी'' या संकल्पनेखाली नेहरू भाजी मंडईत पुतळा चौथऱ्यावर उभारण्यात आला.