esakal | यापुढे विधानसभा लढवणार नाही; तालुक्याचा विकास करणाऱ्यांना बळ देणार : विजय औटी
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena-leader-Vijay-Auti

यापुढे विधानसभा लढवणार नाही : विजय औटी

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (जि. नगर) : विधानसभेसह कुठलीही निवडणूक आपण यापुढे लढवणार नाही. आहे त्यात आपण समाधानी आहोत. शिवसेनेतील नेत्यांमध्ये आता कोण पुढारपण करेल, ते काळ ठरवेल. प्रामाणिकपणे विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहू, असे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी स्पष्ट केले. (Shivsena-leader-Vijay-Auti-will-not-contest-the-assembly-elections-nagar-political-news)

चांगल्या कामात ‘खो’ नको

‘‘गावात मते कमी पडली, त्यामुळे तेथे कामे नको, ही भूमिका योग्य नाही. चांगल्या कामात कोणी ‘खो’ घालू नये. विधानसभेत मी मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण केली होती. तालुक्याची एक उंची होती,’’ - विजय औटी, माजी उपाध्यक्ष विधानसभा

दोन कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले. या रस्त्याचे भूमिपूजन औटी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते होते. पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, पंचायत समितीच्या सदस्य ताराबाई चौधरी, पोपट चौधरी, सरपंच वनिता कसबे, माजी सरपंच बाबासाहेब सासवडे उपस्थित होते.

(Shivsena-leader-Vijay-Auti-will-not-contest-the-assembly-elections-nagar-political-news)

हेही वाचा: Petrol-Diesel दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

loading image