मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर जिल्ह्यात शिवसेना उभारणार कोविड सेंटर

मार्तंड बुचडे
Sunday, 26 July 2020

जग, देश व राज्याला कोरोना व्हायरसने ग्रासले आहे. या काळात आलेला शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा वाढदिवस जाहिराती किंवा फेक्स लावून न करता एखादा सामाजिक उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन केले होते.

पारनेर (अहमदनगर) : जग, देश व राज्याला कोरोना व्हायरसने ग्रासले आहे. या काळात आलेला शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा वाढदिवस जाहिराती किंवा फेक्स लावून न करता एखादा सामाजिक उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन केले होते.

त्याला प्रतिसाद देत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने 50  बेडचे कोवीड सेंटर उभारणार असून रक्तदान तसेच एकळख मास्क व 50 हजार स्यानिटाईझर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती काशिनाथ दाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी विधानपरिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. मनीषा उंद्रे, डॉ. श्रीकांत पठारे, डॉ. लोंढे, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले,  राजेश गवळी, गट विकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : कालव्याच्या कामात ठेकेदाराचे दुर्लक्ष; खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू
दाते म्हणाले, या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधाही करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधेसह आवश्यक औषधे, ड्राय फ्रुटस, उपयुक्त काढाही पुरविणार येणार आहे, अशी माहिती रामदास भोसले यांनी दिली. रुग्णांना दररोजचा चहा, नास्ता व जेवणही मोफत दिले जाणार आहे. या ठिकाणी रुग्णांना कोणतेही शुल्क न आकारता सर्व उपचार केले जाणार आहेत. या सुविधा रुग्णांना गरज आहे तोपर्यंत विनाशुल्क सेवा पुरविणार आहेत.

यावेळी दाते, रामदास भोसले, गणेश शेळके, विकास रोहोकले, अशोक कटारिया, अनिकेत औटी, नितीन शेळके, सुरेश बोरुडे, विजय डोळ, शंकर नगरे,निलेश खोडदे आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena to set up covid Center in Nagar district on the occasion of Chief Minister Thackeray birthday