
अहिल्यानगर : कर्नाटकातील कोळसा खाणीत काम करणाऱ्या मजुरांनी पळून जाऊ नये, यासाठी त्यांच्या १५ बालकांना बीड जिल्ह्यात ओलिस ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडून शेळ्या, गुरे चारण्याची कामे करून घेतली जात होती. अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ (अरणगाव, ता. नगर) व अहिल्यानगर सहायक कामगार उपायुक्त कार्यालयाच्या पथकाने बीड जिल्ह्यात धाडसत्र राबवून या बालकांची सुटका केली.