
अकोले : तालुक्यात पावसाने थैमान घातले असून, त्याचा फटका शेतकऱ्यांबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांना बसला आहे. पेठेचीवाडी (पाचनाई) या अतिदुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था देखील अशीच झाली आहे. सततच्या पावसामुळे या भागातील वीज आठवडाभरापासून गायब आहे. त्यामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडालेले आहे. त्यामुळे शाळेतही अंधारच असून मोबाईलच्या उजेडात विद्यार्थ्यांना धडे गिरवावे लागत आहे.