
पाथर्डी : बीड ते पुणे या एस. टी. बसने प्रवास करणाऱ्या विवाहितेला अचानक रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने बसमधून उतरून द्या, अशी विनंती वाहकाला केली. ‘मला शंभर रुपये दिल्याशिवाय बस थांबवणार नाही,’ अशी बेकायदेशीर भूमिका घेतली. शंभर रुपये घेतल्यानंतरच महिलेला बसमधून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. ४) घडला. या घटनेने मनस्ताप सहन करण्याची वेळ महिलेच्या कुटुंबावर आली.