
तळेगाव दिघे : सिन्नर तालुक्यातील दुसिंगवाडी येथील पती-पत्नी कारमधून लोणीकडे दवाखान्यात जाताना त्यांच्या कारचा दुचाकीला कट लागला. त्यावरून झालेल्या वादात दुचाकीवरील दोघांनी पतीस मारहाण केली, तर पत्नीचा विनयभंग केल्याची घटना लोहारेच्या शिवारात तीन दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.