

Thrilling Episode in Ahilyanagar District Raises Safety Concerns
Sakal
श्रीरामपूर : एका अनोळखी दुचाकीस्वाराने ‘घरी सोडतो’ म्हणून चिमुकल्याला गाडीवर बसवलं... आजीला वाटलं ओळखीचा पाहुणा असेल... पण अर्ध्या तासानंतरही नातू घरी पोहोचला नाही आणि वाकडीसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. श्रीरामपूर ग्रामीण पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा व गावकरी अशा सर्वांची दोन तास धावपळ उडाली. अखेर, एका ‘गोड’ गैरसमजातून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.