
संगमनेर : कर्जुले (ता. संगमनेर) येथे शेतात शौचास बसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत वाद झाले. यावेळी चाकू हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला, तसेच या महिलेची नणंदही गंभीर जखमी झाली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना बुधवारी (ता.११) न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.