
अहिल्यानगर : आंतरधर्मीय विवाह करून युवतीची फसवणूक केल्याचा प्रकार शहरात घडला आहे. या प्रकरणी संबंधित युवतीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. जुनेद मन्सूर शेख (रा. अहिल्यानगर) असे या फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पीडितेने आज पत्रकार परिषद घेत झाल्या प्रकाराची माहिती माध्यमांना दिली. या प्रकरणाला माध्यमांनी वाचा फोडावी, अशी मागणीही तिने केली आहे.