श्रीरामपूर : डॉक्टर असलेल्या विवाहितेचा पती व सासरच्या मंडळींनी केवळ हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला. गर्भवती असताना मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यास्मिन आकिफ इनामदार (वय २९, रा. व्हॅलेंटाईन अपार्टमेंट, श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.