टाकळीभानमध्ये झाला शोलेचा थरार, विरू चढला टाकीवर मग काय?

गौरव साळुंके
Thursday, 3 September 2020

मद्यपि तरूण पत्नी आणि आईसमवेत टाकळीभान परिसरात राहतो. दोन दिवसांपुर्वी त्याच्या घरात वाद झाल्याने त्याने रागात घरातील संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर त्याने घरातील कपडे जाळून घर पेटविण्याचा प्रयत्न केला. दारुच्या नशेत घरासमोरील ५० फूट उंचीच्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढून

श्रीरामपुर: दारू पिल्यावर तळीराम काय करतील याचा नेम नसतो. जोपर्यंत त्यांची नशा उतरत नाही तोपर्यंत ते नातेवाईक,मित्रांना काय परंतु पोलिसांनाही तालावर नाचवत असतात. खरे तर ते प्रशासनाला वेठीस धरतात. तालुक्यातील टाकळी भान येथे तळीरामाने चांगलाच राडा केला.

मद्यपान केलेला तो तरूण गावातील सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढला. आणि आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. पाच तास गावकरी त्याला विनवित होते. गावकऱ्यांनी शेवटी पोलिसांना बोलावलं.

मद्यपि तरूण पत्नी आणि आईसमवेत टाकळीभान परिसरात राहतो. दोन दिवसांपुर्वी त्याच्या घरात वाद झाल्याने त्याने रागात घरातील संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर त्याने घरातील कपडे जाळून घर पेटविण्याचा प्रयत्न केला. दारुच्या नशेत घरासमोरील ५० फूट उंचीच्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढला. माझ्या घरचा वाद मिटवा नाही तर मी आत्महत्याच करतो अशी धमकी द्यायला त्याने सुरूवात केली.

दारुच्या नशेतील तरूण पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस पथक आणि आग्निशामक दलाने मोठ्या प्रयत्नाने त्याला टाकीवरुन खाली उतरविले. 

ग्रामस्थांनी त्याला टाकीवरुन खाली उतरविण्यासाठी अनेक विनविण्या केल्या. परंतु तो कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी पाण्याच्या टाकीसमोर ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. सदर तरुणाने दारुच्या नशेत पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन गुन्हा नोंदविला आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sholay style thrill in Taklibhan village