
श्रीरामपूर : महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने दुसरा अल्पवयीन मुलगा व त्याच्या भावावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी जमिनीवर आदळून पायाला लागल्याने एकजण जखमी झाला. रेल्वे गेटजवळ सूतगिरणी-दिघी रस्त्यावर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे.