नेवासा येथे तहसील कार्यालयावर मोर्चा

सुनील गर्जे
Tuesday, 8 December 2020

दरम्यान शेतकऱ्यांच्या भारत बंदला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली भेंडे येथे शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. आज दिवसभर सर्व व्यवहार बंद होती. 
 

नेवासे : नेवासे तालुक्यात शेतकऱ्यांच्या भारत बंदला आज अल्प प्रतिसाद मिळाला. तालुक्यात फक्त भेंडे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेवासे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.  

दरम्यान तालुक्यात सर्व व्यवहार सुरळीत व शांततेत चालू होते. नेवासे पंचायत समिती ते  तहसील कार्यालय असा पायी मोर्चा काढत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने  माजी आमदार पांडुरंग अभंग, कम्युनिस्ट पक्षाचे नेते बाबा आरगडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांच्या वतीने  तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, ऍड. बंन्सी सातपुते, राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस  गणेश गव्हाणे,  अशोक मिसाळ, दादा गंडाळ, संभाजी माळवदे ,  शंकर भारस्कर आदी सहभागी उपस्थित होते.  

दरम्यान शेतकऱ्यांच्या भारत बंदला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली भेंडे येथे शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. आज दिवसभर सर्व व्यवहार बंद होती. 

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Short response to India Bandh at Nevasa