esakal | मुलगी जन्माला आली, नो टेन्शन! प्रत्येकीला एफडीतून मिळणार ५० हजार

बोलून बातमी शोधा

In Shrigonda, a girl will get Rs 50,000 from FD}

मुलींच्या जन्मदराचा टक्का वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. काही सामाजिक संघटनाही पुढे आल्या आहेत. श्रीगोंद्यातील रोडे अर्बन मल्टीपर्पज बँकेने तर दोन पाऊल पुढे टाकले आहेत.

मुलगी जन्माला आली, नो टेन्शन! प्रत्येकीला एफडीतून मिळणार ५० हजार
sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : पूर्वी घरात मुलगी जन्माला आल्यापासून तिचा वनवास सुरू व्हायचा. तिच्या लग्नाची चिंताही पालकाला सतवायची. काही जण तर तिला जन्माला येण्यापूर्वीच संपवून टाकायचे. त्यामुळे जन्मदर घटत गेला. मुलींच्या घटत्या संख्येमुळे आता वेगळीच समस्या उभी राहिली आहे. मुलांना लग्नासाठीही मुली मिळेनात अशी अवस्था आहे.

मुलींच्या जन्मदराचा टक्का वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. काही सामाजिक संघटनाही पुढे आल्या आहेत. श्रीगोंद्यातील रोडे अर्बन मल्टीपर्पज बँकेने तर दोन पाऊल पुढे टाकले आहेत.

हेही वाचा - गौतम हिरण हत्या प्रकरणी दोघांना घेतले ताब्यात

श्रीगोंदा तालुक्‍यात आगामी वर्षात (8 मार्च 2021 ते 8 मार्च 2022) जन्म घेणाऱ्या मुलींसाठी शहरातील रोडे अर्बन मल्टिपर्पज बॅंकेने गुड न्यूज आणली आहे. "राजकन्या' नावाने ही योजना असेल. 

योजनेचा असा असेल कालावधी

बॅंकेचे अध्यक्ष संतोष रोडे म्हणाले, ""श्रीगोंद्यात गेल्या काही वर्षांत मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर घसरला आहे. मुलींचा जन्मदर वाढला तरच भविष्य उज्ज्वल आहे. त्यासाठी रोडे अर्बन मल्टिपर्पजने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्‍यात पुढच्या 8 मार्चपर्यंत (2022) जन्म घेणाऱ्या मुलीच्या नावे आमची बॅंक स्वत: एक एफडी करणार आहे.

ही कागदपत्रे लागतील

ती मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर तिला पन्नास हजार रुपये मिळतील. ज्यांच्याकडे केशरी व पिवळी शिधापत्रिका आहे, त्यांनाच या योजनेत भाग घेता येईल. त्यामुळे सामान्यांना योजनेचा फायदा मिळेल.'' यादरम्यान जन्म घेणाऱ्या मुलीचा जन्मदाखला व आई-वडिलांचे छायाचित्र दिले, की योजनेत त्या मुलीचा समावेश होईल, असेही रोडे म्हणाले.