
-समीरण बा. नागवडे
श्रीगोंदे : जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणांची प्रारूप रचना सोमवारी (ता.१४) जाहीर होणार आहे. या प्रारूप रचनेकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. या रचनेतून काहींचे भाग्य उजळणार आहे, तर काहींची राजकीय कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, श्रीगोंद्यात सहा गट व बारा गण असणार आहेत.