Ahilyanagar Tractor Accident
esakal
अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे बुधवारी (ता. 26) सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक अपघातात (Tractor Accident) एका आईचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला आणि ट्रॅक्टरखाली दबून दोन लहान चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेत आईसह आणखी एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे.