
घोगरगाव : येथील तरुणाशी बनावट लग्न करून फसवणूक केल्याचा गुन्हा श्रीगोंदे पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. येथील रोहित रमेश तरटे याचे सहा महिन्यांपूर्वी तीन लाख रुपये घेऊन एजंटमार्फत लग्न लावण्यात आले होते. सदर बनावट नवरी फिर्यादीचे घरी सहा महिने राहून पळून गेली. जाताना घरातील पैसे घेऊन गेली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.