
सोनई : येथील मुळा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षणाचे धडे गिरवताना श्रीकांत रामराव काकडे याने सुटाबुटात आणि छातीवर पदकांची शान लावून सैन्यदलात जाण्याचा केलेला संकल्प प्रत्यक्षात साकार केला. मामाने देशसेवेत केलेली शौर्यगाथा पाहून हंडाळवाडी (ता. पाथर्डी) येथील भाचा श्रेयस महेंद्र भापकर याने मामाची प्रेरणा घेऊन सैन्यदलात भरती होण्याचा केलेला; परंतु डेहराडून येथील इंडियन मिलिट्री अकॅडमीच्या निवड चाचणीत खरा करून दाखविला आहे.