esakal | आदिक यांच्याकडून कोविड सेंटरला एक लाख

बोलून बातमी शोधा

Money
आदिक यांच्याकडून कोविड सेंटरला एक लाख
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर ) : नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरसाठी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. शहरात शासकीय कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने त्याबाबत नियोजन केले आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीकरिता मदतीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत नगराध्यक्ष आदिक यांनी एक लाख रुपयांचे अर्थसाह्य देणार असल्याचे जाहीर केले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आदिक कुटुंबाने 20 हजार कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले होते. रुग्णालयांनाही मदत केली होती. दानशूरांनी पुढाकार घेऊन कोविड सेंटरसाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

चांदणी शेख "सेट'उत्तीर्ण

श्रीरामपूर : येथील चांदणी शब्बीर शेख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेली राज्य पात्रता चाचणी (सेट) उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या बोरावके महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अभियंता शब्बीर शेख यांच्या त्या कन्या आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, प्रा. नानासाहेब गायकवाड, आमदार लहू कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, अविनाश आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी शेख यांचे कौतुक केले.