Car Fire Incident :दगडफेक, कार पेटवून दहशत: आठ जणांना अटक ;गोंधवणी रस्त्यावर मध्यरात्री दोन गटांत राडा

Shrirampur Diwali Clash, Car Fire Incident : दिवाळीचे फटाके फोडून परतणाऱ्या तरुणांच्या दोन गटांत श्रीरामपूरमध्ये मध्यरात्री वाद होऊन दगडफेक आणि लाकडी दांड्यांनी मारहाण झाली. एका कारची तोडफोड करून ती पेटविण्यात आली.
Police investigate a violent clash between two groups that led to stone pelting and a car fire in Shrirampur.

Police investigate a violent clash between two groups that led to stone pelting and a car fire in Shrirampur.

esakal

Updated on: 

श्रीरामपूर, : दिवाळीचे फटाके फोडून घरी परतणाऱ्या तरुणांच्या दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान मध्यरात्री हिंसक राड्यात झाले. गोंधवणी रोडवरील दत्तमंदिर परिसरात झालेल्या या घटनेत दोन्ही बाजूंनी दगडफेक व लाकडी दांड्यांनी मारहाण करण्यात आली. एका चारचाकी कारची तोडफोड करून ती पेटवून देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी शहर पोलिसांनी परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक केली.

Loading content, please wait...