
श्रीरामपूर: शहरातील तळ्याकडे जाणाऱ्या पाटावर झालेली ४९ अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आली. पाटबंधारे विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम काल सकाळी राबविण्यात आली. या कारवाईमुळे तळ्यात मिसळणारे दूषित पाणी कमी होण्यास मदत होणार आहे.