
श्रीरामपूर: शहराच्या मध्यवस्तीत शुक्रवारी दुपारी झालेल्या गोळीबाराने अक्षरशः थरकाप उडवला आहे. शिवाजी रस्त्यावरील गिरमे चौकात हुजेफा अनिस शेख याने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुदैवाने अनर्थ टळला असला, तरी या घटनेने शहरातील सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.