श्रीरामपूर : पोलिस ठाण्यातच अधिकाऱ्याला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 नातेवाइकांनी उपनिरीक्षक सुरवाडे यांना धक्काबुक्की करीत जखमी केले.

श्रीरामपूर : पोलिस ठाण्यातच अधिकाऱ्याला मारहाण

श्रीरामपूर: अपहृत मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी पोलिस तपासाबाबत जाब विचारला. यावेळी तपासी अधिकारी उपनिरीक्षक समाधान सुरवाडे व नातेवाइकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संबंधित मुलीच्या नातेवाइकांनी उपनिरीक्षक सुरवाडे यांना धक्काबुक्की करीत जखमी केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा १३ फेब्रुवारी रोजी शहर पोलिसांत नोंदविण्यात आला होता. त्याचा तपास सुरवाडे यांच्याकडे होता. या मुलीच्या शोधासाठी सुरवाडे पोलिस नाईक किरण पवार, हवालदार तुषार गायकवाड यांच्यासह १० मे रोजी पुण्याला गेले होते. तेथून संबंधित मुलगी शिर्डी येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी अपहृत मुलीचा शिर्डी परिसरात शोध घेतला. साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ तिच्या वडिलांना ती सापडली. तिला श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आणले.

आज (ता. १२) दुपारी बाराच्या सुमारास सदर गुन्ह्यातील अपहृत मुलीचा जबाब नोंदवीत असताना वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी मुलीचे नातेवाईक कक्षामध्ये आले. त्यांतील एकाने, मुलीची वैद्यकीय तपासणी का करत नाही, असा सवाल केला. त्यानंतर नातेवाईक व सुरवाडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर तिघांनी मिळून सुरवाडे यांना मारहाण करीत जखमी केले. यावेळी पोलिस ठाण्यात व कक्षामधील नेमणुकीस असलेले अंमलदार सोमनाथ गाडेकर, पोलिस शिपाई भारत तमनर, महिला पोलिस शिपाई योगिता निकम, सरग, ठाणे अंमलदार आलम पटेल, हवालदार पोपट भोईटे, नागरिक सुनील मुथा व सुभाष जंगले यांनी मध्यस्थी करत सुरवाडे यांची सुटका केली. यात गाडेकर यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी सुरवाडे यांच्या फिर्यादीवरून तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

Web Title: Shrirampur Officer Beaten Police Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top