ओळख पटवुन दुचाक्‍या घेवून जाण्याचे आवाहन

गौरव साळुंके
Friday, 20 November 2020

अनेक वर्षांपासुन शहर पोलिस ठाण्यात पडलेल्या दुचाक्‍या संबधीत मालकांनी ओळख पटवुन घेवून जाव्यात.

श्रीरामपुर (अहमदनगर) : अनेक वर्षांपासुन शहर पोलिस ठाण्यात पडलेल्या दुचाक्‍या संबधीत मालकांनी ओळख पटवुन घेवून जाव्यात. अन्यथा पुढील आठ दिवसानंतर सदर दुचाक्‍यांचा जाहीर लिलाव केला जाणार असल्याचे आवाहन पोलिस प्रशासाने केले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सदर पडुन असल्याने दुचाक्‍याचे क्रमांक अस्पष्ट झाल्याने वाहतुक कार्यालयाकडुन वाहन मालकांची माहिती न मिळाल्याने अनेक दुचाक्‍या कितेक वर्षांपासून पोलिस ठाण्यात पडुन आहेत. त्यामुळे संबधीत मालकांनी आपल्या दुचाक्‍याची ओळख पटुन कागदपत्रे जमा करुन दुचाक्‍या घेवुन जाव्यात अन्यथा पुढील आठ दिवसानंतर सदर दुचाक्‍या बेवारस म्हणून लिलावाद्वारे विक्री केल्या जाणार असल्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी वरील सुचनेची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केले आहे.

शहर पोलिस ठाणे परिसरात एक हिरोहोडा एचएफ डिलक्‍स, तीन बजाज पल्सर 150, एक सुझुकी हायते, दोन बजाज सीटी 100, दोन हिरोहोडा सीडीडॉन, एक सुझुकी मॅक्‍स, एक हिरोहोडा प्लस, एक बजाज प्लाटीना आणि एक टिव्हीेएस अपाची अशा दुचाक्‍या आहेत. त्यांची ओळख पटवुन संबधीत मालकांनी घेवून जाण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrirampur police Appeal to take the two wheeler with you