उत्तरप्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यात त्याने... श्रीरामपूर पोलिसांनी मात्र त्याला बिगर नंबरच्या गाडीवर पकडले

गौरव साळुंके
Monday, 20 July 2020

उत्तरप्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यात गावठी कट्याचा धाक धाकवुन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला श्रीरामपूर शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. बबलु मोहन चव्हाण ऊर्फ अतिष (वय २१, रा. कमालपुर) असे सराईत संशयित चोराचे नाव आहे. 

श्रीरामपूर (अहमदनगर) : उत्तरप्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यात गावठी कट्याचा धाक धाकवुन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला श्रीरामपूर शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. बबलु मोहन चव्हाण ऊर्फ अतिष (वय २१, रा. कमालपुर) असे सराईत संशयित चोराचे नाव आहे. 
मध्यरात्रीच्या सुमारास श्रीरामपूर नेवासे रस्त्यावर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालनाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बबलु चव्हाण हा महादेव येथील नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री सापळा रचुन श्रीरामपूर नेवासा रस्त्यावरील वडाळा महादेव फाटयाजवळ विना क्रमांकाच्या दुचाकीसह बबलु चव्हाण याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेवुन चौकशी केली. त्यावेळी चव्हाण यांच्याकडील एक गावठी कट्यासह दोन जिवंत काडतुसे व विना क्रमांकाची दुचाकी असा ९० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 
चौकशी दरम्यान, उत्तरप्रदेश, दिल्लीसह ठाणे, औरंगाबाद, नगर जिल्हयात अनेक ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यामुळे चोरी, घरफोडी, रस्तालुट याचे अनेक उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चव्हाणविरुद्ध अनेक पोलिस ठाण्यात चोरीचे तसेच घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. सराईत गुन्हेगार चव्हाण अनेक दिवसांपासुन फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. परंतू तो सापडत नव्हता. शहर पोलिस पथकाने आज अखेर त्याला गजाआड केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrirampur police arrested a criminal in Ahmednagar district