
आक्षेपार्ह संभाषण व्हायरल झाल्याने श्रीरामपूरचे दोन पोलिस कर्मचारी निलंबित
अहमदनगर : मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण व्हायरल झाल्याने श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना विभागीय चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी रविवारी (ता. ३०) निलंबनाचा आदेश काढला आहे.
हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"
श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांमधील मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले आहे. पोलिस खात्याची बदनामी करणारे हे संभाषण आहे. पोलिसांची समाजातील प्रतिमा मलिन झाली आहे. हे वर्तन बेशिस्त आणि निष्काळजीपणाचे असल्याचा अहवाल श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या संभाषणाच्या अनुषंगाने शनिवारी (ता. २९) जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता.
हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष
या अहवालानुसार पोलिस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि पोलिस कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम २५ आणि मुंबई पोलिस (शिक्षा व अपिल) १९५६ चे कलम ३ नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दोघांना निलंबित केले.या दोघांना पोलिस मुख्यालयात राखीव पोलिस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली रहावे लागणार आहे.
Web Title: Shrirampur Police Suspended Over Offensive Conversation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..