
"राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"
लखनऊ : उत्तर प्रदेशात आता निवडणुकीचा रंग चांगलाच चढायला लागल्याचं चित्र आहे. कारण विविध पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. केंद्रीय पंचायतराज मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करताना त्यांना फेक गांधी असं संबोधलं तर भाजपचं महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करतंय असा दावाही त्यांनी केला. (Rahul Gandhi is fake Gandhi Mahatma Gandhi dream is fulfilling only by BJP Giriraj Singh)
सिंह म्हणाले, "हिंदुत्व भारताचा आत्मा आहे, जे समजायला राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना अनेक जन्म घ्यावे लागतील. पाकिस्तानात बसलेले लोक आणि ओवैसींसारख्या लोकांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. युपीच्या निवडणुकीत यंदा भारतीय लोक आपल्या मताची ताकद दाखवून देतील"
हेही वाचा: राहुल गांधींना झालाय 'मोदी फोबिया'; अमित शहांचा गोव्यात हल्लाबोल
सुनील शर्मा या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना गिरिराज सिंह म्हणाले, "राहुल गांधी हे नकली गांधी आहेत. महात्मा गांधींच्या स्वप्नाला भाजप आणि योगी सरकार पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. याशिवाय सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून राज्यातील सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यावर ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन आपले विकास कामं मोजून दाखवले आहेत. जर अखिलेश यादव यांना यावर आक्षेप असेल तर त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर खटला भरावा"
हेही वाचा: प्रचार सभांवरील बंदी उठणार? निवडणूक आयोगाची उद्या बैठक
दहशतवादाविरोधात संपूर्ण जागचं नेतृत्व भारत करत आहे. कोरोनाच्या व्यवस्थापनात जगानं मोदींची कार्यपद्धतीनं स्विकारली आहे. सर्वाधिक लसीकरणंही आपल्याच देशात झालं आहे. बुबआ (अखिलेश यादव) सुरुवातीला याला भाजपची लस संबोधत होते. त्यांनीही आपल्या वडिलांना हीच लस दिली आहे, असंही यावेळी गिरिराज सिंह म्हणाले.
Web Title: Rahul Gandhi Is Fake Gandhi Mahatma Gandhi Dream Is Fulfilling Only By Bjp Giriraj Singh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..