
श्रीरामपूर : शहराच्या लाखो नागरिकांना पिण्यासाठी जे पाणी दिले जाते, ते शुद्ध नाही, तर मैलामिश्रित आहे. गोंधवणी तलावात जाणाऱ्या मुख्य सिमेंट पाइपलाइनवर थेट शौचालय बांधून त्यातून मैला सोडणाऱ्या समाजकंटकांनी श्रीरामपूरच्या आरोग्यावर टाकलेले हे ‘विषबाण’आता उघड झाले आहे. या घटनेनंतरही प्रशासन गप्प असल्याने रिपाइंच्या नेतृत्वाखाली आज (ता.१) नगर परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. शहराला दूषित पाणी देणाऱ्यांवर फक्त गुन्हा नको, त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवला पाहिजे, असा थेट इशारा देण्यात आला.