

Fraudulent Baba Busted; Multiple Victims Feared in Shrirampur Case
sakal
श्रीरामपूर: पोटाचा आजार बरा करण्याच्या नावाखाली एका असहाय महिलेला जादुटोणा, उदी आणि गुंगीच्या औषधांचा वापर करून लुबाडणाऱ्या खटकाळी (ता. श्रीरामपूर) येथील गणेश माधवराव शिंदे ऊर्फ गणेश महाराज याच्या पापाचा घडा भरला आहे. या ढोंगी बाबाने महिलेवर वारंवार बलात्कार करत तिच्याकडून १८ ते २० लाख रुपये उकळले. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला आज बेड्या ठोकल्या. त्याच्या दरबारातील अघोरी प्रकारांमुळे जिल्हा हादरला आहे.