शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आता गाव तेथे राष्ट्रवादी

गौरव साळुंके
Monday, 7 December 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी राज्यभरात जेष्ठनेते शरदचंद्र पवारांचे हात बळकट करण्यासाठी गाव तेथे राष्ट्रवादी संघटना उभारण्याचे आपले प्रयत्न आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी राज्यभरात जेष्ठनेते शरदचंद्र पवारांचे हात बळकट करण्यासाठी गाव तेथे राष्ट्रवादी संघटना उभारण्याचे आपले प्रयत्न आहेत. पक्ष मजबुतीसाठी युवकांनी राजकारणासह समाजहिताचे कार्य करण्याचे, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले.

हेही वाचा : बायको अन्‌ मी शेतात गवत काढत होतो, मागे बघतोय तर, बिबट्याचा प्रत्यक्षदर्शीचा थक्क करणारा अनुभव 
तालुक्यातील माळवाडगाव येथील महेश त्रिभुवन यांची नुकतीच तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. यावेळी निवडीचे पत्र प्रदान करुन त्रिभुवन यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आदिक बोलत होते.

जेष्ठनेते शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आजच्या युवकांनी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष मजबुतीसाठी भक्कम कार्य करावे. शालेय विद्यार्थ्यांना येणारया विविध शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी आपले नेहमी सहकार्य राहणार असल्याची, ग्वाही अविनाश आदिक यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष लकी सेठी, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष हर्षल दांगट, सचिन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, उत्तम आसने, श्रीकांत दळे, इम्रान शेख उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shrirampur taluka NCP will form a village