esakal | श्रीरामपूर तालुका वार्ता : प्रार्थना भवनाच्या कामास प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

Shrirampur Taluka News

शिरसगाव येथे लोकसेवा प्रार्थना भवनाच्या कामास नुकताच प्रारंभ झाला. उपनगराध्यक्ष करण ससाणे व सरपंच आबासाहेब गवारे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष पास्टर प्रशांत चक्रनारायण व पास्टर आण्णा अमोलिक यांनी प्रार्थना केली. 

श्रीरामपूर तालुका वार्ता : प्रार्थना भवनाच्या कामास प्रारंभ

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील शिरसगाव येथे लोकसेवा प्रार्थना भवनाच्या कामास नुकताच प्रारंभ झाला. उपनगराध्यक्ष करण ससाणे व सरपंच आबासाहेब गवारे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष पास्टर प्रशांत चक्रनारायण व पास्टर आण्णा अमोलिक यांनी प्रार्थना केली. 

अनेक वर्षापासुन शिरसगाव येथे लोकसेवा प्रार्थना भवन होण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र कोरोनाच्या संकटात कामाला प्रारंभ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कामाच्या शुभारंभ सोहळ्यास जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, राजेंद्र वाघमारे, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, कार्लस साठे, सुभाष तोरणे, ब्रिजलाल बिखचंदानी, नगरसेवक निलेश भाकरे, मंगल सगळगिळे, दिलीप सगळगिळे, मंगल तोरणे, उद्योजक अविनाश काळे उपस्थित होते. दिपक कदम यांनी सुत्रसंचालन केले. 

शहीद भगतसिंग जयंती 
श्रीरामपूर : येथील विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने शहीद भगतसिंग जयंती काल साजरी करण्यात आली. भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बडाख, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रकाश सावंत यांच्या हस्ते शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने परिसरातील विद्यार्थ्यांनी अभिवादन सभेचे आयोजन केले होते. 

भाऊसाहेब धोत्रे, संतोष त्रिभुवन यांनी मनोगत व्यक्त केले. देश पारतंत्र्यात असताना मार्क्सच्या विचारांवर निष्ठा ठेवुन क्रांतिवीर भगतसिंग यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष केला. भगतसिंगचा लढा साम्राज्यशाही विरोधात तर होताच शिवाय तो देशातील सरंजामदारी, जातियवादाच्या विरोधात देखील असल्याचे बडाख यांनी सांगितले.

भारतीयांच्या समतेसाठी, भयमुक्त व सन्मानपुर्ण जीवनाच्या निर्मीतीसाठी होतायाचं कारण भगतसिंगाचा व्यापक दृष्टीकोन आहे. एक वैज्ञानिक विचारधारा असलेले भगतसिंग यांच्या विचारातील स्वातंत्र्य आजही मिळालेले नसल्याची खंत बडाख यांनी व्यक्त केली. यावेळी अमोल सोनावणे यांनी क्रांतिकारी गीते सदर केली. तर भानुदास धनवटे यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image