श्रीरामपूर तालुक्यातील बातम्या वाचा एकाच ठिकाणी

गौरव साळुंके
Thursday, 1 October 2020

येथील मारूती बिंगले यांची नुकतीच भाजपाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी बिंगले यांची निवड घोषित केली.

बिंगले यांची निवड

श्रीरामपूर (नगर) : येथील मारूती बिंगले यांची नुकतीच भाजपाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी बिंगले यांची निवड घोषित केली. गेल्या अनेक वर्षांपासून बिंगले हे सामाजिक कार्यात सक्रीय आहे. कचेरी रोड मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यास प्रारंभ केला. पुढे ते भाजपात सक्रीय झाले. नवरात्रोत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. त्याच्या निवडीचे माजी पालकमंत्री राम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी खासदार दिलीप गांधी यांनी अभिनंदन केले.

पोषण आहाराचे वाटप

श्रीरामपूर : नवीन पिढी सुदृढ होणे गरजेचे आहे. ती जबाबदारी पालक आणि अंगणवाडी सेविका पार पाडत असल्याचे प्रतिपादन नगरसेविका स्नेहल खोरे यांनी केले. येथील प्रभाग 16 परिसरातील अंगणवाडीमध्ये पोषण आहार वाटपावेळी त्या बोलत होत्या. वाढती लोकवस्ती लक्षात घेता शहरातील अंगणवाड्या वाढविणे गरजेचे होते. गेल्या काही वर्षांपासून परिसरात अंगणवाडी सुरू करण्याची नागरीकांची मागणी होती. नागरीकांनी पाठपुरावा केल्याने अंगणवाडी सुरू झाल्यामुळे पालक व पाल्यांची गैरसोय थांबली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य असलेली नवीन पिढी सुदृढ होण्यास मदत होणार असल्याचे नगरसेविका खोरे यांनी व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी सेविका लता गायकवाड, अलिमुन शेख, मोहिनी कोठकर, हिरा नेहे, जयश्री बिंगले, नीलिमा भोगे, वंदना शिंदे, निर्मला वानखेडे उपस्थित होत्या.

शिक्षकांची आढावा बैठक 

श्रीरामपूर : बेलापूर व उक्कलगाव केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांची नुकतीच आढावा बैठक पार पडली. बैठकीला गटशिक्षणाधिकारी संजिवन दिवे यांनी उपस्थिती लावली होती. बैठकीत केंद्रप्रमुख शेलार यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. बैठकीला बेलापूर उर्दु शाळेतील खान, फत्याबाद शाळेतील शेंडगे, कुर्‍हेवस्ती शाळेतील जाधव यांनी विविध विषय सादर केले. तर पुढील बैठक होणार असून त्यात जे.टी.एस. हायस्कुल, बेलापूर येथील मुलीची शाळा, गळनिंब येथील शाळा, उक्कलगाव येथील गुड शेफअर्ड इग्लिंश मिडीयम मधील शिक्षक विविध विषय सादर करणार आहे. रायपल्ली यांनी आभार मानले. केंद्र सहाय्यक सुर्यभान वडितके, राजेंद्र पंडित यांनी बैठकीचे नियोजन केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrirampur taluka news