सिद्धटेक : कर्जत-जामखेड’ला ‘ड्रॉप’

माजी मंत्री राम शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; आता सावध व्हा
ram shinde
ram shinde

सिद्धटेक: एकदा झालेली चूक मतदार पुन्हा करीत नाहीत. ती चूक चांगल्याप्रकारे त्यांच्या लक्षात आलेली आहे. ज्याप्रमाणे ‘ड्रॉप’सारखा प्रसंग एकदाच घडतो, पुढील वेळी सावधगिरी बाळगली जाते. त्यामुळे तो पुन्हा होत नाही. त्याप्रकारे ‘राष्ट्रवादी’च्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाचाही असाच ‘ड्रॉप’ झाला आहे, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली. त्यांचा रोख आमदार रोहित पवार यांच्यावर होता.

ram shinde
धक्कादायक : आईसह बाळाचा विहिरीत आढळला मृतदेह 

कुळधरण जिल्हा परिषद गटातील गणप्रमुख, गटप्रमुख, तसेच शक्ती केंद्रप्रमुख यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, सरचिटणीस सचिन पोटरे, शांतिलाल कोपनर, पप्पूशेठ धोदाड, नागनाथ जाधव, चिंतामणी सांगळे, बंडा मोरे, सचिन बनकर, रमेश शेळके, दत्तात्रय मांढरे, नारायण माळशिकारे, कुळधरण गटातील ग्रामस्थ उपस्थित होते.

सचिन पोटरे म्हणाले, की कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप सत्तेत येणार, हाच राजकीय अंदाज होता. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ने फोडाफोडीचे राजकारण केले. मात्र, लोकांना आता त्यांची चूक पूर्णपणे लक्षात आलेली आहे. त्यामुळे आगामी कर्जत-जामखेड भाजपमय झालेला होईल.

सिद्धटेक तीर्थक्षेत्र विकास आराखडा, बेलवंडी, दुधोडी, भांबोरे, हिंगणगाव,राजू, बाभूळगाव या परिसरातील रस्त्यांची कामे, गणेशवाडीतील ३३ केव्ही वीज उपकेंद्र अशा अनेक कामांच्या बाबतीत या बैठकीत चर्चा झाली.

आता मध्यस्थ नको !कर्जत-जामखेड मतदारसंघातील समस्यांची कोणत्याही प्रकारची जाण नसताना, अन्य ठिकाणाहून येऊन केवळ दडपशाहीने विजय मिळवणारांना आगामी काळात जनमतातूनच चांगली चपराक बसणार असल्याचे राम शिंदे म्हणाले. त्यासाठी बूथ सक्षम करणार आहोत. शक्ती केंद्रे मजबूत करायची आहेत. हे करीत असताना यापुढे कोणत्याही मध्यस्थाची मदत घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com