
शिर्डी : अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आयोजित मांडव डहाळ्याच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली. सायंकाळचे थंडगार वारे, हिरवळीवर टाकलेल्या खुर्च्यांवर मोठ्या संख्येने जमलेले निमंत्रित. शहराच्या राजकीय पटलावर सक्रिय असलेल्या नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या मारत फोडलेले फटाक्यांना उपस्थितांनी दिलेली दाद. सोहळ्याचे संयोजक माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांच्या वतीने देण्यात आलेली आमरस आणि मांड्यांची मेजवानी. दरवर्षी प्रमाणे यंदाचा रौप्यमहोत्सवी मांडव डहाळ्याचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.