दारू दुकानात शिरला आणि लाखाची खरेदी करूनच बाहेर पडला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

एका व्यक्तीला केवळ चारच बोटल देण्याची मुभा असतानाही काहीजण बॉक्सच्या बॉक्स घेऊन जाताना दिसत होते.

नगर : सध्या सोशल मीडियावर केवळ आणि केवळ मद्यपींचीच चर्चा आहे. कोण म्हणतो मी सगळा बॅकलॉग भरून काढणार, तर कोणी आणखी वेगळा संकल्प करतो आहे. या तळीरामांना अर्थव्यवस्था वाचविणारे योद्धे असे संबोधले जाते आहे.

नगरमध्ये पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. काहींमध्ये तर दारू घेण्यावर वाद झाले.पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दुकानेही सील केली.

एका व्यक्तीस केवळ चार बोटल देण्याचे सांगितले असताना भरगच्च दारू खरेदी केली जाते आहे. एका पठ्ठ्यानं तर तब्बल 95 हजारांची दारू विकत घेतली.

कर्नाटकमध्येही दारूविक्रीवरील बंदी हटवली आहे. तेथे एका दिवसात कर्नाटक राज्यानं तब्बल 45 कोटी रुपयांच्या दारूची विक्री केली. यात एका इसमानं विकत घेतलेल्या 95 हजार 347 रुपयांची दारू विकत घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळा निर्णय झाला आहे. गर्दीमुळे केरळ आणि मध्य प्रदेशातील दारूची दुकान बंद ठेवण्यात आलेली आहेत. दिल्ली सरकारनंही दारूवर अतिरिक्त 70 टक्के कोरोना साथीचा कर लावला आहे. 

बंगळुरू आणि अन्य भागातही दारूची दुकानं सुरू झाल्यावर लोक मोठ्या संख्येने दारू घेण्यासाठी आले पाहायला मिळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A single customer bought liquor worth lakhs of rupees