देशी व विदेशी दारु विकताना शेवगाव तालुक्यात सहा जणांना पकडले

सचिन सातपुते
Wednesday, 16 December 2020

शेवगाव शहरात तीन, अमरापूर हद्दीत एक तर बोधेगाव हद्दीमध्ये दोन ठिकाणी हाँटेल, टपरी व घराच्या आडोशाला देशी व विदेशी दारु विकतांना सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव शहरात तीन, अमरापूर हद्दीत एक तर बोधेगाव हद्दीमध्ये दोन ठिकाणी हाँटेल, टपरी व घराच्या आडोशाला देशी व विदेशी दारु विकतांना सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सात हजार ४४८ रुपयाच्या १०१ देशी व विदेशी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. शेवगाव पोलिस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शेवगाव येथे नव्याने बदलून आलेले पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या आदेशावरुन बोधेगाव हद्दीतील हातगाव (ता. शेवगाव) येथे राजू बाबुराव मातंग व एकनाथ ज्ञानदेव जऱ्हाड हे दोघे मुख्य चौकात आडोशाला बसुन वेगवेगळ्या ठिकाणी देशी दारु विकतांना आढळून आले. मातंग याच्याकडून ३६४ रुपये किमतीच्या देशी दारुच्या सात बाटल्या तर ज-हाड याच्याकडून ८३२ रुपये किमतीच्या देशी दारुच्या १६ बाटल्या हस्तगत केल्या. 

शेवगाव शहरातील रामनगर येथे करतारसिंग रामसिंग जुनी याच्याकडून ६२४ रुपये किमतीच्या १२, लांडे वस्ती येथे संतोष रामनाथ कवडे याच्याकडून ७२८ रुपये किमतीच्या १४, तर वरुर रोड वरील संग्राम हाँटेलच्या शेजारी राहुल नवनाथ कुसळकर याच्याकडून ४ हजार ४८४ रुपये किमतीच्या ४४  देशी व विदेशी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या.

अमरापूर हद्दीतील सुलतानपूर येथे गावातील पाण्याच्या टाकीखाली विनायक साहेबराव काते याच्याकडून ४१६ रुपये किमतीच्या ८ देशी दारुच्या बाटल्या असा सुमारे ७ हजार ४४८ रुपये किमतीच्या १०१ देशी व विदेशी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. सर्व सहा जणांना ताब्यात घेवून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.   

ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. दिलीप राठोड, रविंद्र शेळके, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, सुखदेव धोत्रे आदींनी केली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six arrested for selling liquor in Shevgaon taluka