श्रीगोंद्यात साडेसोळा हजार पाहुणे बाहेरचे, कोणीकोणावर रागावायचे

संजय आ. काटे
Sunday, 31 May 2020

बाहेरुन आलेल्या स्थानिक लोकांसह अनेक गावात जावयांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या मूळ घरी त्यांचा आश्रय न मिळाल्याने त्यांना सासुरवाडी जवळ केली. मात्र, या लोकांमुळे अडचणी वाढत असल्याचे ग्रामसुरक्षा समितीचे म्हणणे आहे.

श्रीगोंदे : शेजारचे तालुके कोरोनाच्या संकटात फणफणले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र, सध्या एकाच घरातील दोन जण पाॅझिटिव्ह आहेत. तालुक्यात बाहेरुन आलेल्या लोकांची संख्या 16 हजार 532 एवढी मोठी असतानाही प्रशासन कोरोनाला आता दोनवर थांबविण्यासाठी अटापिटा करीत आहे. लोकांचे सहकार्य मिळाल्यास श्रीगोंद्यात कोरोनाला येथेच थोपविता येवू शकते.

नगर व कर्जतसोबत अडचणीची असणारी पुणे जिल्ह्याची हद्द तालुक्याला लागून अाहे. कोरोनाचा उद्रेक होण्याची भिती सगळ्यानाच होती. अर्थात ती अजूनही असली तरी प्रशासनासह गावकारभारी डोळ्यात तेल घालून कोरोनाचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मेहनत घेत आहे. महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणेसह इतर काही सरकारी विभागातील कर्मचारी यात गुंतले आहेत.

हेही वाचा - रोहित पवार -राम शिंदे आले एकत्र, चर्चा झाली पण उद्या हे घडणारच

दरम्यान पुणे जिल्ह्यातील दौंड व शिरुर तालुक्यात कोरोनाचा फैलाव गतीने होत असतानाच आता सोबत कर्जतच्या राशीन भागातील संकट वाढते आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात श्रीगोंदे फॅक्टरी येथे एकाच कुटूंबातील बालकासह दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तो परिसर लगेच प्रतिबंधात्मक क्षेत्र लागू करीत प्रशासनाने सील केला.

बाहेरुन विशेषत: पुणे व मुंबईकर पाहुण्यांनी तालुक्यातील यंत्रणेला डोकेदुखी वाढविण्याते काम चालविले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकांचा ताण प्रशासनवर पडत आहे. या लोकांची कोरोना घेवून आले की काय ही दहशत गावकऱ्यांवर आहे. त्यामुळे या लोकांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. तालुक्यात दोन रुग्ण सापडल्याने साधा ताप आला तरी लोक घाबरुन लगेच आरोग्य यंत्रणेला कळवित असल्याने ही चांगली बाब असली तरी त्यातून घाबरुन जावू नये असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन खामकर यांनी केले आहे. 

  • काय सांगते श्रीगोंद्यातील कोरोना आकडेवारी...
  • बाधित रुग्ण -2 
  • * कोरोना संशयावरुन तपासणी केलेले- 53 (पैकी दोघांचे अहवाल अप्राप्त) 
  • * कोविड 19 केंद्रावर क्वारंटाईन केलेले लोक- 17 
  • * बाहेरुन आलेल्या लोकांची संख्या ( होम क्वारंटाईन शिक्के मारलेले)- सोळा हजार 532
  • * 1 मे पासून संस्थात्मक विलगीकरण संख्या- 1 हजार 417 
  • * सध्या संस्थात्मक क्वारंटाईन असणारे लोक- 300. 

जावयांची श्रीगोंदेकरांवर दहशत
बाहेरुन आलेल्या स्थानिक लोकांसह अनेक गावात जावयांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या मूळ घरी त्यांचा आश्रय न मिळाल्याने त्यांना सासुरवाडी जवळ केली. मात्र, या लोकांमुळे अडचणी वाढत असल्याचे ग्रामसुरक्षा समितीचे म्हणणे आहे. कारण जावई असल्याने त्यांच्या दिमतीला सासुरवाडीचे लोकांना नाईलाजाने राहावे लागत असल्याने ते जावयांच्या संपर्कात येत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixteen and a half thousand outside visitors in Shrigonda