इतक्या लाख लोकांना नगरमधून जायचंय बाहेर...  

So many applications from the city to go to the distric
So many applications from the city to go to the distric
Updated on

नगर : लॉकडाउनच्या काळात परजिल्ह्यातील मजूर, विद्यार्थी मोठ्या संख्येने अडकून पडले होते. त्यांच्या घरपरतीच्या प्रवासाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दोन मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात वेबसाइट कक्ष सुरू केला. नोडल अधिकारी म्हणून बाहेरच्या राज्यातील श्रमिकांच्या घरवापसीसाठी महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील, तर वेबसाइट पासेस कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांची नियुक्ती करण्यात आली. 

जिल्ह्याबाहेर जाण्या-येण्यासाठी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावे लागतात. या अर्जासोबत वाहन क्रमांक, आरोग्य तपासणी प्रमाणपत्र व कारण नमूद करावे लागते. ऑनलाइन वेबसाइटवर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी नोडल अधिकारी किसवे यांच्यातर्फे होत आहे. जिल्हा प्रशासनातील विविध शाखांतील 48 कर्मचारी या कामी नियुक्त करण्यात आले आहेत. 

लॉकडाउनमध्ये परजिल्ह्यात जाण्याकरिता गेल्या दीड महिन्यांत वेबसाइट पासेस कक्षात तब्बल दोन लाख अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले. त्यात 95 हजार 456 अर्ज मंजूर केले, तर 95 हजार 585 नामंजूर करण्यात आले. कक्षाचे काम 14 तास सुरू असून, दररोज साडेचार हजार अर्ज प्राप्त होत आहेत. 

वेबसाईट कक्षातील कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू आहे. सकाळी 10 ते सहा व सायंकाळी सहा ते रात्री 12 अशा दोन शिफ्टमध्ये ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जांचे काम निरंतर सुरू आहे. या कालावधीत दोन लाख अर्ज प्राप्त झाले. यापैकी 95 हजार 456 अर्ज मंजूर करण्यात आले, तर 95 हजार 585 हजार अर्ज कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे नामंजूर करण्यात आले. एक हजार 129 अर्ज प्रलंबित होते. कक्षाचे सहायक अधिकारी म्हणून परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी गणेश पवार, तहसीलदार अमृता साबळे, नायब तहसीलदार प्रियंका पाचरणे, लिपिक अतुल बनसोड, रवींद्र मिसाळ, अक्षय दुधाळ, वरलक्ष्मी रामदिन आदी कर्मचारी जबाबदारी पार पाडत आहेत. 

अर्जाची छाननी अन्‌ तत्काळ निर्णय 
जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन वेबसाइट पासेस कक्षाचे काम निरंतर सुरू असून, अर्जाची छाननी करीत तत्काळ निर्णय देण्यात येतो. अनावश्‍यक कारणे व अर्धवट माहितीचे अर्ज नामंजूर होत आहेत. 
- उदय किसवे, उपजिल्हाधिकारी, अहमदनगर

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com