'ट्विटर' सारखा आंतरराष्ट्रीय समाजमाध्यम भाजपच्या दबावाखाली

balasaheb thorat
balasaheb thoratesakal

संगमनेर (जि.अहमदनगर) : ट्विटर (twitter) या आंतरराष्ट्रीय समाजमाध्यमावर प्रत्येक जण आपले मत मांडू शकतो. लोकशाहीत विचारस्वातंत्र्य असते, फक्त ते देशाच्या विरोधात नसावे ही अपेक्षा असते. समाजहिताच्या बाबी मांडण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येकाला दिलेला आहे. खासदार राहुल गांधी (rahul gandhi) व आम्ही देखील तेच करीत होतो. त्यांच्या नंतर आज काँग्रेस पक्षाचे (congress party) अधिकृत खाते ब्लॉक करण्यात आले. राहुल गांधी यांचे समर्थन केल्याच्या कारणावरून आपलेही ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आले असून ही लोकशाही व विचार स्वातंत्र्याची गळचेपी असल्याची प्रतिक्रीया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

लोकशाही व विचार स्वातंत्र्याची गळचेपी - थोरात

ते म्हणाले, खरं तर ट्विटर ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक मान्यताप्राप्त संस्था आहे. अशा संस्थेने एखाद्या पक्षाच्या, म्हणजेच भाजपच्या किंवा सत्तेच्या दबावाखाली येणे हे त्यांच्यासाठी कमीपणाचे आहे. भारतात विचार स्वातंत्र्याची गळचेपी कशी सुरू आहे हे दाखवून देणारे हे उत्तम उदाहरण आहे. ट्विटर त्यासाठी कारणीभूत आहेच, पण त्यापेक्षाही अधिक जबाबदार भाजप आणि केंद्र सरकार असल्याचा आरोपही मंत्री थोरात यांनी केला. दिल्लीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खूनाच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाची ओळख उघड झाल्याबद्दल भाजपासह इतरांनी केलेल्या तक्रारींमुळे ट्विटरने प्रथम राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर बंदी आणल्यानंतर राहुल गांधींना समर्थन देणारे राज्यातील काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही ट्विटर अकाउंट ब्लॉक केले आहे. भाजपाकडून लोकशाहीवर आघात होत असल्याचे सांगत थोरात यांनी जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी केंद्र सरकार व भाजपा जबाबदार असल्याचा घणाघात केला आहे.

balasaheb thorat
"देशाला स्वातंत्र्य मिळाले; स्वराज्य नाही" - तुषार गांधी
balasaheb thorat
दूध खरेदी करताना सावधान! उत्पादकांसह ग्राहकांचीही लूट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com